भारताची संस्कृती असणाऱ्या सप्तशास्त्रीय नृत्यप्रकारांपैकी पुढील नृत्यशैली म्हणजे ओडिसी. ही नृत्यशैली भारताच्या आग्नेय प्रातांत ओरिसा ह्या प्रदेशामध्ये उदयास आली. नाट्यशास्त्र ह्या ग्रंथात ‘ओड्रमागधी’ ह्या संकल्पनेचा उल्लेख भरतमुनींनी केलेला आहे
नरसोबाची वाडी हे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र कृष्णा तीरावर आहे. तेथे दत्तात्रेयांच्या ‘मनोहर पादुका’ आहेत. तर गाणगापुरी ‘निर्गुण पादुका’ आहेत. वाडीला नरसिंह सरस्वती गुरु महाराजांचा १२ वर्षे वास होता.