भारताची संस्कृती असणाऱ्या सप्तशास्त्रीय नृत्यप्रकारांपैकी पुढील नृत्यशैली म्हणजे ओडिसी. ही नृत्यशैली भारताच्या आग्नेय प्रातांत ओरिसा ह्या प्रदेशामध्ये उदयास आली. नाट्यशास्त्र ह्या ग्रंथात ‘ओड्रमागधी’ ह्या संकल्पनेचा उल्लेख भरतमुनींनी केलेला आहे
भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली आणि भारतावर राज्य करण्याच्या त्यांच्या मनीषेने भारताच्या संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक मंदिरे पाडून त्यावर मशिदी उभारण्यात आल्या.