कश्मीरचे सौंदर्य वादातीत आहे. पण प्रत्यक्ष कश्मीर मात्र कायम वादग्रस्त राहिलेला आहे. आपल्यापैकी अनेकांनी कदाचित पर्यटक म्हणून कश्मीरला भेट दिली असेल किंवा हिंदी चित्रपटातून आपण कश्मीर पाहिलेला असतो. अन्यथा बातम्यांमधून तेथे होणारा हिंसाचार, दहशतवाद, आपल्या सैनिकांचे शौर्य, प्रसंगी आलेले हौतात्म्य या गोष्टी आपल्यापर्यंत पोहचत असतात.