स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर हा अजरामर ग्रंथ लिहीताना त्याच्या पहिल्या भागातल्या पहिल्याच प्रकरणाची सुरुवात समर्थ रामदासांच्या या ओवींनी केली होती.
महाभारतकार व्यासांनी ‘जय नाम इतिहासोsयम्’ म्हंटले आहेत. हा इतिहास आहे. आपल्या राष्ट्राची वाङ्मयीन, आध्यात्मिक, तत्वचिन्तनात्मक, मार्गदर्शक, ऐतिहासिक महाधरोहर. महाभारताचे कालातीत मार्गदर्शक सामर्थ्य वादातीत आहे.
आपल्या कर्तृत्वाची उत्तुंग शिखरे निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांविषयी किंवा काळरुपी कातळावर स्वतःच्या कर्तृत्वाची कायमची मोहोर उमटवणाऱ्या धीरोदात्त नेतृत्वाविषयी नेहमीच काही ना काही गूढ शिल्लक राहते. भारतच नव्हे तर जगातील इतिहासाबाबत हाच अनुभव येतो.