गणिताला आपल्याकडे रूक्ष म्हणण्याची परंपरा आहे. कुणास ठाऊक, केवळ आपल्याकडेच नाही, तर कदाचित ही परंपरा जगभरही असेल. ह्या नितांतसुंदर विषयाला रूक्ष का म्हणायचं ह्याचं उत्तर मात्र कुणाजवळही नसतं. एक फॅशन ह्या पलिकडे ह्याला काही अर्थ नाही हेच खरं.
सत्येतिहासावर आधारित कोणत्याही लेखास किंवा लेखमालेस हात घालताना त्यामागे लेखकाची भूमिका (किंवा त्याचे प्रयोजन) स्पष्ट असायला हवी आणि ती भूमिका तशी एकदा स्पष्ट झाली की मग त्यानंतर लेखनकाम करताना त्या भूमिकेस चिकटून राहण्याची चिकाटीही त्या लेखकाकडे