आज एखादी गोष्ट लिहिणे किंवा ‘लिखाण’ हा आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. आपल्या हातून होणारी ती एक सहज कृती आहे. शाळेच्या प्रश्न-उत्तरांपासून ते कॅलेण्डरवरच्या दुधाच्या हिशेबापर्यंत आपण काही ना काही तरी लिहीतच असतो.
वेदाध्ययनाची बैठक पक्की व्हावी ह्यासाठी वेदाङ्गांचा अभ्यास केला जातो. शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष, निरुक्त व छन्द ही सहा वेदाङ्गे वेदाध्ययनासाठीची पायाभरणी करतात.