भारतीयांनी शोधलेल्या संख्या, त्यांची चिन्हे, दशमान पद्धती ह्या सर्वांवर गेल्या चार लेखात आपण एक दृष्टिक्षेप टाकला. संख्यांच्या आकलनापाठोपाठ साहजिकच त्यांच्यावरील क्रिया आम्हास अवगत होऊ लागल्या,
वर्तमान स्थितीत असलेली दशमान पद्धत हिंदूनीच निर्माण केली आणि पूर्णत्वासही नेली ही गोष्ट आता जवळपास जगभर मान्यता पावलेली आहे. गेल्या लेखात आपण दशमान पद्धत कशी स्फुरली किंवा सुचली असावी ह्याचे ओझरते दर्शन घेतले होते.
लहानवयात शाळेत शिकत असताना (बहुधा पाचव्या इयत्तेत) आम्हाला अंक लिहिण्याच्या प्रमुख दोन पद्धती आणि त्यांची नावे शिकवली होती. त्यातील एक होती रोमन (I, II, III वगैरे) तर दुसरी होती अरेबिक (1, 2, 3 वगैरे).
सत्येतिहासावर आधारित कोणत्याही लेखास किंवा लेखमालेस हात घालताना त्यामागे लेखकाची भूमिका (किंवा त्याचे प्रयोजन) स्पष्ट असायला हवी आणि ती भूमिका तशी एकदा स्पष्ट झाली की मग त्यानंतर लेखनकाम करताना त्या भूमिकेस चिकटून राहण्याची चिकाटीही त्या लेखकाकडे