सप्त शास्त्रीय नृत्यप्रकारांपैकी महत्त्वाची असणारी कथकली ही नृत्यशैली. वेगळ्या पद्धतीने सादर केली जाणारी ही नृत्यशैली लोकसंस्कृतीचा विशेष वारसा लाभलेल्या केरळ ह्या प्रांताची आहे.
नृत्यकलेचे प्राचीनत्त्व आणि परंपरा ह्याबद्दल पुरावा म्हणून मंदीरे, त्यावरील शिल्पे ह्यांचाच केवळ विचार न करता साहित्यात, मुख्यतः संस्कृत साहित्यात उपलब्ध ग्रंथांचा, त्यातील संदर्भाचा देखील विचार करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
भारत हा विविध कलांनी नटलेला देश आहे. ह्या सर्व कलांना एक प्रकारची परंपरा असल्याचे दिसते. अशीच परंपरा नृत्यकलेच्या बाबतीतही दिसून येते. भारतामध्ये नृत्यकला ही बरीच पूर्वीपासून अवगत असावी ह्याचे पुरावे प्राप्त होतात.