जनमानसामध्ये कश्मीरचे सम्राट ललितादित्य, सम्राट जयापीड यांच्यासारखे राजे तितकेसे प्रसिद्ध नाहीत. आपल्याला शिकवलेल्या इतिहासात, भारतात छोटी–छोटी राज्ये होती हे वारंवार सांगितले जाते;
राजतरंगिणी हा ग्रंथ विविध दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. कश्मीरचा इतिहास सांगणारा ग्रंथ म्हणून तो महत्त्वाचा आहेच; पण त्याचे शीर्षक सुचवते त्याप्रमाणे या काळनदीच्या प्रवाहात कितीही मोठा राजा वा सम्राट असला तरी तो केवळ एक तरंग मात्र आहे
जनमानसामध्ये कश्मीरचे सम्राट ललितादित्य, सम्राट जयापीड यांच्यासारखे राजे तितकेसे प्रसिद्ध नाहीत. आपल्याला शिकवलेल्या इतिहासात, भारतात छोटी–छोटी राज्ये होती हे वारंवार सांगितले जाते; पण त्यांच्यातले दिग्विजयी राजे, एक राजा आणि त्याचे मांडलिक राजे या परंपरेकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेले दिसून येते. यांच्याविषयी संस्कृत साहित्यात मात्र पदोपदी असंख्य संदर्भ येतात.
राजतरंगिणी हा ग्रंथ विविध दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. कश्मीरचा इतिहास सांगणारा ग्रंथ म्हणून तो महत्त्वाचा आहेच; पण त्याचे शीर्षक सुचवते त्याप्रमाणे या काळनदीच्या प्रवाहात कितीही मोठा राजा वा सम्राट असला तरी तो केवळ एक तरंग मात्र आहे हे मनावर ठसवणे हे त्या ग्रंथाचे उद्दिष्ट आहे.