स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर हा अजरामर ग्रंथ लिहीताना त्याच्या पहिल्या भागातल्या पहिल्याच प्रकरणाची सुरुवात समर्थ रामदासांच्या या ओवींनी केली होती.
महत् पुण्याईने प्राप्त झालेला हा नरदेह. या नरदेहाचे सार्थक करणे केवळ आपल्याच हाती आहे. या देह माध्यमातूनच आपण आपले जीवन साध्य ठरवून ते सार्थ करायला हवे