आज एखादी गोष्ट लिहिणे किंवा ‘लिखाण’ हा आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. आपल्या हातून होणारी ती एक सहज कृती आहे. शाळेच्या प्रश्न-उत्तरांपासून ते कॅलेण्डरवरच्या दुधाच्या हिशेबापर्यंत आपण काही ना काही तरी लिहीतच असतो.
आपल्या मागच्या लेखात आपण ‘प्राचीन भारत’ ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला. यात आपण प्रामुख्याने विविध साहित्यिक पुरावे अथवा संदर्भ यांचा विचार केला. पण कोणत्याही समाजाचा अथवा देशाचा इतिहास हा केवळ साहित्यिक पुराव्यांनी सिद्ध होऊ शकत नाही.
कोणत्याही देशाच्या व्यक्तिमत्वावर त्या देशाच्या वर्तमानाचा जितका प्रभाव असतो, तितकाच भूतकाळाचादेखील असतो. प्राचीन संस्कृती लाभलेले चीन, ग्रीस, इटली यांच्यावर असलेल्या त्यांच्या भूतकाळाचा प्रभाव तेथील नागरिकांच्या दैनंदिन जगण्यातूनही दिसून येतो