आज एखादी गोष्ट लिहिणे किंवा ‘लिखाण’ हा आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. आपल्या हातून होणारी ती एक सहज कृती आहे. शाळेच्या प्रश्न-उत्तरांपासून ते कॅलेण्डरवरच्या दुधाच्या हिशेबापर्यंत आपण काही ना काही तरी लिहीतच असतो.
वेदाध्ययनाची बैठक पक्की व्हावी ह्यासाठी वेदाङ्गांचा अभ्यास केला जातो. शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष, निरुक्त व छन्द ही सहा वेदाङ्गे वेदाध्ययनासाठीची पायाभरणी करतात.
वर्तमान स्थितीत असलेली दशमान पद्धत हिंदूनीच निर्माण केली आणि पूर्णत्वासही नेली ही गोष्ट आता जवळपास जगभर मान्यता पावलेली आहे. गेल्या लेखात आपण दशमान पद्धत कशी स्फुरली किंवा सुचली असावी ह्याचे ओझरते दर्शन घेतले होते.
भाषा हे निव्वळ अभिव्यक्तीचे साधन नसून ते मनुष्याच्या सामाजिक ओळखीचे एक महत्त्वाचे माध्यम असते. जात, धर्म, देश यांच्या बरोबरीनेच भाषा या संकल्पनेभोवती देखील सामूहिक अस्मिता विणली जात असते.
कोणत्याही देशाच्या व्यक्तिमत्वावर त्या देशाच्या वर्तमानाचा जितका प्रभाव असतो, तितकाच भूतकाळाचादेखील असतो. प्राचीन संस्कृती लाभलेले चीन, ग्रीस, इटली यांच्यावर असलेल्या त्यांच्या भूतकाळाचा प्रभाव तेथील नागरिकांच्या दैनंदिन जगण्यातूनही दिसून येतो
लहानवयात शाळेत शिकत असताना (बहुधा पाचव्या इयत्तेत) आम्हाला अंक लिहिण्याच्या प्रमुख दोन पद्धती आणि त्यांची नावे शिकवली होती. त्यातील एक होती रोमन (I, II, III वगैरे) तर दुसरी होती अरेबिक (1, 2, 3 वगैरे).
वेदकालीन स्त्रीजीवन व्याख्यानमाला - १ - वैदिक साहित्यातील स्त्रीदेवता