आज एखादी गोष्ट लिहिणे किंवा ‘लिखाण’ हा आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. आपल्या हातून होणारी ती एक सहज कृती आहे. शाळेच्या प्रश्न-उत्तरांपासून ते कॅलेण्डरवरच्या दुधाच्या हिशेबापर्यंत आपण काही ना काही तरी लिहीतच असतो.
राजतरंगिणी हा ग्रंथ विविध दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. कश्मीरचा इतिहास सांगणारा ग्रंथ म्हणून तो महत्त्वाचा आहेच; पण त्याचे शीर्षक सुचवते त्याप्रमाणे या काळनदीच्या प्रवाहात कितीही मोठा राजा वा सम्राट असला तरी तो केवळ एक तरंग मात्र आहे
कवितेला फुटलेली पालवी आणि सुकुमार केशर हे निश्चितपणे सहोदर आहेत. त्यांचे जन्मस्थान एकच आहे. कारण मी शारदाभूमी – कश्मीर वगळता अन्यत्र त्यांचा असा उत्फुल्ल बहर पाहिलेला नाही.
कश्मीरचे सौंदर्य वादातीत आहे. पण प्रत्यक्ष कश्मीर मात्र कायम वादग्रस्त राहिलेला आहे. आपल्यापैकी अनेकांनी कदाचित पर्यटक म्हणून कश्मीरला भेट दिली असेल किंवा हिंदी चित्रपटातून आपण कश्मीर पाहिलेला असतो.
वेदाध्ययनाची बैठक पक्की व्हावी ह्यासाठी वेदाङ्गांचा अभ्यास केला जातो. शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष, निरुक्त व छन्द ही सहा वेदाङ्गे वेदाध्ययनासाठीची पायाभरणी करतात.
डिओफॅण्टस समीकरणांचा एक प्रकार असलेली ‘पेल’ ह्या गणितज्ञाच्या नावाने प्रसिद्ध असलेली (मात्र पेलने कधीही न सोडवलेली) समीकरणे ह्यांचा गेल्या लेखात आपण एक धावता आढावा घेतला.
भाषा हे निव्वळ अभिव्यक्तीचे साधन नसून ते मनुष्याच्या सामाजिक ओळखीचे एक महत्त्वाचे माध्यम असते. जात, धर्म, देश यांच्या बरोबरीनेच भाषा या संकल्पनेभोवती देखील सामूहिक अस्मिता विणली जात असते.
राजतरंगिणी हा ग्रंथ विविध दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. कश्मीरचा इतिहास सांगणारा ग्रंथ म्हणून तो महत्त्वाचा आहेच; पण त्याचे शीर्षक सुचवते त्याप्रमाणे या काळनदीच्या प्रवाहात कितीही मोठा राजा वा सम्राट असला तरी तो केवळ एक तरंग मात्र आहे हे मनावर ठसवणे हे त्या ग्रंथाचे उद्दिष्ट आहे.
कवितेला फुटलेली पालवी आणि सुकुमार केशर हे निश्चितपणे सहोदर आहेत. त्यांचे जन्मस्थान एकच आहे. कारण मी शारदाभूमी – कश्मीर वगळता अन्यत्र त्यांचा असा उत्फुल्ल बहर पाहिलेला नाही.
देवी सरस्वतीचे निवासस्थान म्हणून तर ते शारदापीठ आहेच पण ऐतिहासिकदृष्ट्या तक्षशीला, नालंदा यांच्याप्रमाणे कश्मीर हे विद्येचे फार मोठे केंद्र होते. हे शारदास्तवन जे आपल्या नित्य प्रार्थनेचा भाग आहे, ती आद्य शंकराचार्यांची रचना असून तिचा इतिहास असा सांगितला जातो – कश्मीरमधील शारदादेवीचे मंदिर हे ज्ञानविज्ञानाचे फार मोठे केंद्र होते.
कश्मीरचे सौंदर्य वादातीत आहे. पण प्रत्यक्ष कश्मीर मात्र कायम वादग्रस्त राहिलेला आहे. आपल्यापैकी अनेकांनी कदाचित पर्यटक म्हणून कश्मीरला भेट दिली असेल किंवा हिंदी चित्रपटातून आपण कश्मीर पाहिलेला असतो. अन्यथा बातम्यांमधून तेथे होणारा हिंसाचार, दहशतवाद, आपल्या सैनिकांचे शौर्य, प्रसंगी आलेले हौतात्म्य या गोष्टी आपल्यापर्यंत पोहचत असतात.